बीड : पुणे जिल्ह्यात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणाने रविवारी मध्यरात्री बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना थेट तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सर्जन न आल्याने त्याला उपचार मिळाले नाहीत म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अबोध अशोक भोसले (३१, रा.सावरगाव, ता. भूम) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शिक्षणशास्त्रातील पदविका घेतलेल्या अबोधने दहा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ एका गावात गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्ये त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली होती. काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार करून कुटुंबीयांनी त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात ११ मार्च रोजी दाखल केले होते. त्याच्यावर स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये उपचार सुरू होते.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री त्याने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात त्याच्या पाठीला गंभीर इजा झाली होती. त्याने उडी मारल्याचे काही तासांनी लक्षात आल्यानंतर अबोधला अपघात विभागात दाखल केले गेले होते. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. भाऊ अमोल भोसले यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली.
सर्जन आलेच नाहीत
अपघात विभागात डॉ.शंकर काशीद यांनी उपचार सुरू केले. त्यानंतर सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ यांना कॉल देण्यात आला. मानसोपचारतज्ज्ञांनी येऊन तपासणी करीत औषधी दिले. सर्जन रुग्णालयात फिरकलेच नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. याबाबत चौकशी केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगितले गेले.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार


