Share

सचिन वाझे प्रकरणी अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

Published On: 

मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

ता प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘सचिन वाझे प्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही.’ असं त्यांनी सांगितलं आहे.

तर, ‘याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे की कोणत्याही गोष्टींमध्ये चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही. सरकार तसं अजिबात होऊ करणार नाही. NIA आणि ATS अशा दोन यंत्रणा याप्रकरणी चौकशी करत आहेत. ज्या घटना पुढे येतात, त्यानुसार कारवाई करण्यात येईल,’ असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, सचिन वाझे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल तीन तासांहून अधिक काळ तपासणी झाल्यानंतर त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याचं चाचण्यांमधून समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!