Share

सरकारी सूचनांचे पालन करा, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राज ठाकरेंचे समर्थन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे.

यामुळेच विरोधी पक्षांनी कोरोना आळा घालण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी देखील लॉकडाऊन बाबत चर्चा केली आहे.

याबाबत, मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे. ‘राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं’ अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे, राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

यानंतर आता मनसेतर्फे सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर राज्यातील जनतेने सरकारी यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करावं असे देखील आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीबद्दल सुरु असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात १० दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!