नवी दिल्ली :देशात कोरोनाने थैमान घातले असताना देखील राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक आहे असे अल्बर्ट आइनस्टाइन म्हणतात आणि हे या लॉकडाउनने सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
This lock down proves that:
“The only thing more dangerous than ignorance is arrogance.”
Albert Einstein pic.twitter.com/XkykIxsYKI— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2020
सोमवारी राहुल गांधी यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्याचबरोबर अल्बर्ट आईन्स्टाईन यांच वाक्य शेअर करत “हे या लॉकडाउननं सिद्ध केलं”, अशी टीका राहुल गाधींनी केली आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी भूमिका मांडत आहेत. लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यापासून हा लॉकडाउन अपयशी ठरल्याची टीका राहुल गांधी करीत आहे. यासंदर्भात त्यांनी आलेख आणि आकडेवारीची माहिती देऊन सरकारवर निशाणाही साधला. दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एक ट्विट केलं आहे.
यापूर्वीही राहुल गांधी यांनी देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरल्याचे टीकास्त्र सोडले होते. मध्यंतरी त्यांनी ट्विरवर कोरोनाच्या जगभरातील आकडेवारीचे काही आलेख (ग्राफ) शेअर केले होते. ज्या देशांमध्ये वारंवार लॉकडाऊन लादण्यात आला त्याठिकाणी काहीच फायदा झाला नाही. उलट कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, याकडे राहुल गांधी यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
नाद खुळा : ‘या’ पठ्ठ्याने चक्क चांदीचा मास्क बनवून घेतला
भाजपमध्ये गेल्याचा किंचितही पश्चात्ताप नाही- विखे पाटील
हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे; जितेंद्र आव्हाड माध्यमांवर भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

