परभणी : सोनपेठ येथील फाल्गुनी नदीला परतीच्या पावसाने पूर आला आहे. यात शेळगाव येथे फाल्गुनी नदीवरील पुलावर पुराचे पाणी वाहत असताना पुल पार करण्याचे धाडस करणाऱ्या ट्रॅक्टर सह पाच जण वाहुन गेले. पण वाहून जाणाऱ्या पाच जणांचे प्राण वचवण्यात शेळगावच्या ग्रामस्थांना यश आले आहे. सदरील घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दिपक गुलाब कदम, बाबासाहेब सुभाष कदम, गोट्या राजेभाऊ कांबळे, रामा धुराजी उफाडे, शिवाजी बबन आडे यांना वाचवण्यात यश आले आहे.
परभणी जिल्ह्यात शनिवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लागली होती. यात सोनपेठ तालुक्यातील शेळगाव उक्कडगाव रोडवरील फाल्गुनी नदीला रविवारी सकाळ पासुनच पुर आला होता. दरम्यान शेळगाव हुन उक्कडगाव कडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकासह पुरामुळे अडकलेले दोघे जण आपल्या मोटारसायकल वर गावाकडे जाण्याची त्या ट्रॅक्टर मध्ये आपल्या मोटारसायकल सह बसले. परंतु नदीवरील पूल पार करण्याच्या नादात अंदाज न आल्याने ट्रॅक्टर पुलाखाली गेला.
यात बसलेले सर्वच जण वाहुन जात होते. योगायोगाने नदी पात्रातील एका झाडाला दोघे अडकले. तर तिघांनी एका झाडाचा आसरा घेतला. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली असता ते ताबडतोब मदतीसाठी धावून आले. प्रशासनास या घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदिप काकडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य करत वाहून गेलेल्या पाचही जणांना ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर असल्यानेच चुकवलेले पैसे जमा करावे लागले’
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- रिया चक्रवर्तीच्या ‘त्या’ फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

