Share

धक्कादायक : प्रशासन हादरलं; नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी; पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे.

बुधवारी सकाळी मालेगाव येथे या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल रात्री प्राप्त झाला असून तो पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे आणखी चार जणांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले आहे.

तसेच नाशिक मध्ये आठ दिवसांपूर्वी निफाड येथील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. हा तरुण दुकानामध्ये काम करत होता. त्यानंतर गेल्या सोमवारी नाशिक शहरतील गोविंदनगर भागात देखील एका संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यांनी खबरदारी घ्या, सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करा, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!