लातूर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे सामन्या माणसाचे आर्थिक चक्र बिघडले आहे तसेच समाजातील दिव्यांग बांधव त्यांच्याही हाताला काही काम सध्या कोरोनाच्या या वाढत्या संसर्गामुळे मिळत नाहीये. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच शासनाने दिलेल्या निकषा प्रमाणे अनुदान वाटप झाले नव्हते त्यामुळे दिव्यांग बांधव अडचणीत सापडले होते. मात्र आता पालिकेतर्फे त्यांच्या खात्यात दिव्यांग टक्केवारी नुसार काही रक्कम जमा होणार आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून दिव्यांग बांधवांना पालिकेच्या वतीने शासनाने दिलेल्या निकषानुसार अनुदान वाटप करण्यात आले नव्हते यामुळे दिव्यांग बांधव अडचणीत सापडले होते त्यातच कोरोनाची दुसरी लाट आणि परत कडक लॉकडाऊन पडल्याने दिव्यांग बांधव आर्थिक अडचणीत आले होते त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिलासादायक निर्णय घेतला आणि शहरातील नोंदणीकृत १९८ दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांग टक्केवारी नुसार २ लाख ७३ हजाराची नियमाची मदत खात्यात जमा जमा होणार आहे यामुळे ऐन संकटात पालिकेने दिलेले हे अनुदान दिलासादायक ठरणार आहे.
दिव्यांग बांधवांना पालिकेच्या वतीने शासन निर्णय प्रमाणे मदत व्हावी यासाठी दिव्यांग बांधव संघर्ष करीत होते पण पालिकेला असणारी आर्थिक चणचण यामुळे निधी देण्यात विलंब होत होता त्यातच आता लॉक डाऊन लागल्याने मोठे संकट या बांधवावर आले होते पण उशिरा का होईना पालिकेने योग्य वेळी केलेली ही मदत त्यांना फायदेशीर ठरणार आहे यात दिव्यांग टक्केवारी नुसार १९८ लाभार्थी ४० ते ६० टक्केवारी असलेल्या दिव्यांग बांधवास एक हजार रुपये,तसेच ६० ते ८० टक्केवारी असलेल्या १४०० रुपये, ८० ते १०० टक्केवारी असलेल्याना दोन हजारा प्रमाणे पत्येकी निधी त्यांच्या खात्या त वर्ग करण्याची कारवाई करण्यात आली आहे. एकूणच पालिकेने निधी वितरित केल्याने दिव्यांग बांधवांसाठी मोलाची मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? पटोलेंचा सवाल
- ४५ ते ५९ वयोगटातील ६० हजार नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!
- उस्मानाबादेत महावितरणचा ढिसाळ कारभार, मुख्य वाहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित
- शाळासिद्धि अंतर्गत, शाळांना स्वयंमूल्यमापनाच्या सूचना
- विमानाची प्रवाशी संख्या कोरोनामुळे घटली, नांदेड विमानतळावर शुकशुकाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

