🕒 1 min read
इंग्लंड : आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार 8 सप्टेंबर रोजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हा सामना पुढील महिन्यात २४ऑक्टोबर रोजी युएयी मध्ये होणार आहे. या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघासह 3 राखीव खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विश्वचषकासाठी निवडलेल्या या संघात एक खेळाडू असा आहे, जो सलग सातव्या स्पर्धेत खेळेल. त्याच्यासोबत खेळलेले खेळाडू एकतर निवृत्त झाले आहेत किंवा संघाबाहेर आहेत.
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे जो मागील सर्व विश्वचषकांमध्ये खेळला आहे. 2007 साली पहिल्यांदा आयोजित आयसीसी टी -20 विश्वचषक संघाचा तो भाग होता. त्यानंतर तो आतापर्यंत खेळलेल्या शेवटच्या 6 टी -20 विश्वचषकांमध्ये खेळला आहे. वर्ष 2007 मध्ये, त्याने 4 सामन्यात 88 धावा केल्या, ज्यात 50 धावांच्या नाबाद डावाचा समावेश होता. 2009 मध्ये 5 सामने खेळून 131 धावा केल्या आहेत.
2010 च्या विश्वचषकात त्याने 3 सामन्यात 84 धावा केल्या. 2012-13 मध्ये 5 सामने खेळल्यानंतर त्याच्या खात्यात फक्त 82 धावा होत्या. त्यानंतरच्या स्पर्धेत रोहितने 6 सामन्यात एकूण 200 धावा केल्या. 2015-16 विश्वचषकात रोहितला 5 सामन्यात फक्त 88 धावा करता आल्या.
रोहित बरोबरचे दिग्गज सेवानिवृत्त झालेले खेळाडू
महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण सारखे भारतीय दिग्गज जे टी -20 विश्वचषक खेळले आहेत त्यांनी निवृत्ती घेतली आहे. तर हरभजन सिंग बराच काळ संघाबाहेर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे – पटोले
- गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली; शिवसेना नेत्यानेच केला दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
