Share

जाणून घ्या देशभरात ‘बर्ड फ्ल्यू’ची नेमकी काय आहे स्थिती ?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : हरियाणातल्या पंचकुला जिल्ह्यात दोन कुक्कुटपालन केंद्रात एवीयन इन्फ्लूएंजा अर्थात बर्ड फ्ल्यू’चे पॉझीटीव्ह नमुने आढळल्याची आयसीएआर- एनआयएचएसएडी या प्राणी रोग विषयक राष्ट्रीय संस्थेने पुष्टी दिल्यानंतर आणि गुजरातमधल्या जुनागड जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यात आणि राजस्थान मधल्या सवाई माधोपुर, पाली, जैसलमेर आणि मोहर जिल्ह्यात कावळ्यांमध्ये पॉझीटीव्ह नमुने आढळल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर बाधित राज्यानी एवीयन इन्फ्लूएंजा आटोक्यात आणण्यासाठीच्या कृती आराखड्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना पशुपालन विभागाने दिल्या आहेत.

आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश,हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यात या रोगाची पुष्टी झाली आहे. केरळमधल्या बाधित दोन्ही जिल्ह्यात कलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्याचे वृत्त असून निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरु आहे.

ज्या राज्यात या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही अशा राज्यानी पक्ष्यांमध्ये असाधारण मृत्यू आढळल्यास त्यावर लक्ष ठेवावे आणि आवश्यक पावले वेगाने उचलता यावीत यासाठी तातडीने कळवावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. केरळ, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात यासंदर्भात भेट देण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

दिल्लीतल्या हस्तसाल व्हिलेजमधल्या डीडीए पार्क मध्ये 16 पक्षांचा असाधारण मृत्यू झाल्याचे समजते. दिल्लीच्या एनसीटीच्या पशुपालन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून नमुने आयसीएआर-एनआयएचएसएडीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

कुक्कुट पालक शेतकरी आणि जनता (अंडी आणि चिकनचे ग्राहक) यांच्यात या रोगासंदर्भात जागरूकता अतिशय महत्वाची आहे. अंडी आणि चिकनसंदर्भात ग्राहकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी पशुपालन विभागाच्या सचिवानी आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. यासंदर्भात अफवांना थारा न राहता ग्राहकांचा विश्वास कायम राहील यासाठी आरोग्य मंत्रालयाने योग्य त्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी विनंतीही करण्यात आली आहे. याशिवाय कुक्कुट उत्पादनाच्या सुरक्षिततेसंदर्भात, वापरासाठी सुरक्षित अशा शिजवण्याच्या पद्धती याबाबत जागरूकता वाढवण्याची विनंतीही राज्यांना करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!