Share

अखेर नांदुर मध्यमेश्वर जलदगती कालव्यात सोडले पाणी

Published On: 

वैजापूर : येथुन वैजापुर व गंगापुर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण वरदान असलेल्या नांदुर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यास अखेर सायंकाळी उन्हाळी आवर्तनसाठी २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग टप्प्या-टप्प्याने वाढवून आठशे क्युसेक करणार असल्याचे जलसंपदा विभागातर्पेâ सांगण्यात आले. हे पाणी शुक्रवारी (दि.९) पहाटे गंगापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होणार असुन पायथा ते माथा या नियमानुसार आधी गंगापूर तालुक्यातील गावांना पाण्याचे वितरिकेद्वारे वाटप करण्यात येईल अशी माहिती नामका विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल अंभोरे यांनी दिली.

वैजापुर व गंगापुर तालुक्यातील शतकNयांना पिण्यासाठी व शेतीसाठी उन्हाळी आवर्तनसाठी दि.५ एप्रिलपासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु परिसरातुन पाण्यासाठी मागणी न आल्याने दि.५ तारखेला सोडण्यात येणारे पाणी रद्द करण्यात आले. यामुळे परिसरातील शेतकNयांमध्य नाराजी पसरली होती. आवर्तन रद्द झाल्याने परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. शिवाय सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले नसते.

याची दखल घेत आ.बोरनारे यांनी तातडीने नामका अधिकारी यांची बैठक घेऊन परिसरातील शेतक़Nयांना पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी कळवले व दोनच दिवसात परिसरातील अनेक शेतकNयांनी पाणी मागणी अर्ज भरले. जवळपास दहा हजार हेक्टरचे पाणी मागणी अर्ज आल्यावर बुधवारी सायंकाळी सहा वाजता नांदुर मध्यमेश्वर धरणातून एक्सप्रेस कालव्यात अखेर आ.बोरनारे यांच्या मध्यस्थीने प्रथम २०० क्युसेक व नंतर आठशे क्युसेक वेगाने पाणी नामका एक्सप्रेस सोडण्यात आले. शुक्रवारी सकाळपर्यंत हे पाणी गंगापुर पर्यंत पोहोचेल. यामुळे परिसरातील शेतकNयांना याचा मोठा फायदा होणार आहे. परिसरातील शेतकNयांनी पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!