Share

अखेर जलसंपदा विभागाची परीक्षा पुढे ढकलली

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची ता. 25 व 26 नोव्हेंबर 2019 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हजारो परीक्षार्थींना यामुळे दिलासा मिळाला असून, आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्याच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची व बृहन्मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता एकाच दिवशी परीक्षा होणार होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कुठली तरी एकच परीक्षा देता येणार असल्याने जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदनाद्वारे केली होती.

तसेच यासंदर्भात आमदार चव्हाण वेळोवेळी मुख्य सचिव कार्यालयाशी वारंवार संपर्क करीत होते. अनेक उमेदवारांनी दोन्हीही परीक्षांसाठी अर्ज केले होते. त्यामुळे अशा अनेक उमेदवारांची कुठली तरी एक संधी हुकणार होती. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या वतीने होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी या निवेदनाद्वारे केली होती.

अखेर राज्याच्या जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) राज्यस्तरीय निवड समितीच्या वतीने शुक्रवारी पत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांना बसणे शक्य व्हावे यासाठी जलसंपदा विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे म्हटले आहे. वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी आमदार चव्हाण यांचे आभार व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1198571412325380096?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1198563490933297153?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!