मुंबई : अनपेक्षित फोन कॉल आल्याने छोट्या पडद्यावरील मालिका ‘चला हवा येऊ द्या’ (‘Chala Hawa Yeu Dya’) मध्ये काम करणारा संगीत दिग्दर्शक तुषार देवल (Tushar Deol) गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होता. या चर्चा त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या पोस्टमध्ये त्याने एका हिंदी अभिनेत्रीचा उल्लेख करत तिच्यामुळे त्रस्त असल्याचे म्हटले होते. आता अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत माफी मागितल्याची माहिती नुकतीच शेअर केली आहे.
दरम्यान तुषारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री गुलकी जोशीचा(Actress Gulki Joshi) व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, ‘माझ्या मागच्या एका मुलाखतीमध्ये मी CINTAAचे कार्ड दाखवले होते. या कार्डवर फोन नंबर दाखवण्यात आला आहे. हा फोन नंबर माझा नसून तुषार देओल यांचा आहे. तुमचे सर्वांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आणि तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असतो.
https://www.instagram.com/p/CXOWBWIAVJc/?utm_source=ig_web_copy_link
मात्र अनेकांनी माझा नंबर समजून तुषार यांना फोन केला आहे. दिवसभरात त्यांना १०० ते २०० फोन जात आहेत. या सर्वामुळे ते त्रस्त झाले आहेत. मी विनंती करते तो फोन नंबर डिलिट करा. मी त्यांना ओळखत पण नाही’ असे बोलताना दिसत आहे. गुलकी जोशी समजून त्यास अनपेक्षित फोन कॉल प्रकरण असल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
- आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करा; शिक्षक संघटनेकडून मागणी!
- आकाश चोप्राने निवडला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ; विराट कोहलीला दिला डच्चू
- ‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’

