बिहार : ठरलं तर…! बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू नेते नितीशकुमार मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील. सुत्रांच्या माहितीनुसार, हा शपथविधी सोहळा १६ नोव्हेंबरला होऊ शकतो.
एनडीएला काठावरचं बहुमत मिळालं आणि बिहारमध्ये पुन्हा भाजप-जेडीयूचं सरकार येणार हे पक्कं झालं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव व राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी कडवी झुंज दिली. राजद बिहारमधील मोठा पक्ष बनला असून भाजप केवळ एका जागेने मागे आहे. या निवडणुकीत नितीशकुमार यांना मोठा फटका बसला आहे.
त्यांच्या पक्षाच्या जागा या कमी झाल्या असून भाजप मोठा भाऊ बनला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून उलट-सुलट चर्चा होऊ लागल्या होत्या. निकालानंतर बहुमत मिळून देखील नितीशकुमार यांनी मौन धारण केल्याचं दिसून आलं होतं. भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी म्हणाले की नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार यात वादच नाही. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असे आम्ही वचन दिले होते, या वचनावर आम्ही ठाम आहोत. कोणी जास्त जागा जिंकतं कोणी कमी, हे निवडणुकीत होत असतं. पण या सत्तेचे आम्ही समान भागीदार आहोत असे भाजपतर्फे वारंवार सांगण्यात आले.
नितीशकुमार यांनी ट्विट करून निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी जनता मालक आहे आणि त्यांनी एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे, असे नितीशकुमार म्हणाले. तसेच, निवडणुकीदरम्यान मिळालेल्या पाठिंब्याबद्दल नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यामुळे काल नितीशकुमार यांनी निकालांवरून मौन सोडल्याचं दिसून आलं.
जनता मालिक है। उन्होंने NDA को जो बहुमत प्रदान किया, उसके लिए जनता-जनार्दन को नमन है। मैं पीएम श्री @narendramodi जी को उनसे मिल रहे सहयोग के लिए धन्यवाद करता हूँ।
— Nitish Kumar (@NitishKumar) November 11, 2020
महत्वाच्या बातम्या
- भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका !
- ‘खेळ आता सुरु झालाय’; अर्णबने उद्धव ठाकरेंना ललकारलं
- ‘मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांना लादणं हा लोकमताचा अवमान’
- पुणे पदवीधर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला!
- दलाई लामांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा’, माजी मुख्यमंत्र्यांची मागणी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

