मुंबई: हिवाळी अधिवेशन मुंबईमध्येच घेण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच सोबत हिवाळी अधिवेशनाची तारीख देखील पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. मात्र आता हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हिवाळी अधिवेशन नागपुरातच घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा गाजत आहे त्याच सोबत राज्यातील ड्रग्स प्रकरण सुद्धा चांगलेच चर्चेत आहे त्यामुळे आता या हिवाळी अधिवेशनात विरोधक राज्यसरकारला चांगलेच धारेवर धरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जानेवारीनंतर मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे अशा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच सोबत विधान परिषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला होणार आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. मात्र हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. हे अधिवेशन किती दिवसांचं होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाहीये.
महत्वाच्या बातम्या:
- विजयानंतर राहुल द्रविडच्या कोचिंगबद्दल अश्विन म्हणाला…
- …त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल- संजय राऊत
- झूठ बोले कौआ काटे, अनिल बोंडे खोटारडे आहेत; नवाब मलिकांचा आरोप
- ‘निलंबनाची कारवाई करुन एसटी चालू करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकार करतंय’
- IND vs NZ: 2 देश, 2 अर्धशतके किवी फलंदाजाचा अनोखा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

