मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीतील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून घणाघाती हल्ला केला आहे. ट्विटरवर त्यांनी अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. यातील संभाषणामध्ये दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडेच्या या वक्तव्यावरुन ते खोटं बोलत आहेत, असा आरोप आता नवाब मलिकांनी केला आहे.
अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, हे दाखवणारी ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. अमरावतीत उसळलेल्या दंगल प्रकरणी भाजप नेत्यांनी पैसा पुरवून हिंसक कारवाया घडवून आणल्या, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तर महाविकास आघाडीनेच या दंगलींना पैसा पुरवल्याचा आरोप अनिल बोंडे आणि इतर भाजप नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हे ट्विट केलं आहे.
गोंध्रा दंगलीनंतर गुजरात किंवा अहमदाबादमध्ये दंगल झालीच नाही. त्याआधी अहमदाबादमध्ये दरवर्षी दंगल ठरलेली असायची. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून असे कृत्य झाले नाही. राज्यात फडणवीसांचं सरकार आलं, तेव्हाही दंगल झाली नाही. भाजपचं सरकार जिथं असतं, तिथे दंगल घडवण्याची हिंमत कुणीही करत नाही. पण ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं, त्या ठिकाणी दंगली होतात. कारण अशा हिंसक कारवाया करणाऱ्यांना नेत्यांकडून संरक्षण मिळत असतं. याआधीच्या 5 वर्षांच्या सरकारमध्ये कोणत्याही संवेदनशील भागात दंगे झाले नाहीत, असा अनिल बोंडे ऑडियो क्लीपमधील संभाषणामध्ये म्हणाले आहेत. दरम्यान, अनिल बोंडेंची ही ऑडिओ क्लिप असून ते किती खोटं बोलत आहेत हे पहा, असं म्हणत मलिक यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही पापी लोक बुरखे घालून फिरता आणि आमच्यावरच…- संजय राऊत
- तुमचं सगळं चमचा मंडळ धुतल्या तांदळाचं आहे काय?- संजय राऊत
- आधी तक्रारींचे निराकरण मगच नियुक्त्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

