Share

अखेर दोन महिन्यानंतर पोर्नोग्राफी केसमध्ये तुरुंगात असणारे राज कुंद्रा घरी परतणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्रा यांना जामीन दिला आहे. राज कुंद्रावर अश्लील व्हिडीओ बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे. राज कुंद्राला १९ जुलै रोजी चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती.

राज कुंद्रा हे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आहे. राजवर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते अॅपवर सादर करणे या गंभीर आरोपांना सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांनी सुमारे 1500 पानांचे आरोपपत्रही दाखल केले होते. पण आता अखेर राज कुंद्राला सुटकेचा नि: श्वास मिळाला आहे.

राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता आणि सतत न्यायालयातून जामिनासाठी विनवणी करत होता. अशा परिस्थितीत आज बऱ्याच दिवसांनी त्याला जामीन मंजूर झाला आहे. अलीकडेच शिल्पा शेट्टी माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेली, जिथे तिने पायी चढून आईचे आशीर्वाद घेतले.

त्याच दिवशी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्प यांच्याविरोधात 1500 पानांचा चार्ट-शीट न्यायालयात दाखल केला. शिल्पाचा हा प्रवास राजच्या सुटकेशी जोडला जात होता. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!