Share

विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते बाप्पाची आरती; ‘महाराष्ट्र देशा’चा स्तुत्य उपक्रम – तृप्ती डिग्गीकर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ‘महाराष्ट्र देशा’ने महिला पत्रकारांना याठिकाणी बोलावले. आरतीचा मान महिलांना देण्यात आला. त्यासोबतच १० दिवस विविध क्षेत्रातील महिलांना याठिकाणी बोलवून त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यासाठी महाराष्ट्र देशाचे खुप अभिनंदन. कोरोना काळाला शोभेल असा येथील साधेपणा मन प्रसन्न करून गेला. पत्रकार तृप्ती डिग्गीकर यांनी महाराष्ट्र देशाच्या गणेशोत्सवात आपल्या भावना मांडल्या.

‘महाराष्ट्र देशा’ने गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरतीचा उपक्रम राबवला. यावेळी औरंगाबाद शहरातील पत्रकारिता क्षेत्रातील महिलांना बोलावून त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र देशाच्या या उपक्रमाचे कौतुक करतांना पत्रकार तृप्ती डिग्गीकर म्हणाल्या, महाराष्ट्र देशाने राबवलेली ही संकल्पना अतिशय स्तुत्य आहे. यानिमिताने विविध क्षेत्रातील महिला एकत्रित आल्या. सोबतच यावेळी जी चर्चा करण्यात आली.

ज्या गप्पा यावेळी रंगल्या त्या अतिशय महत्वाच्या होत्या. खरे पाहता लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सुरु केला. त्यावेळी कर्मकांडाला महत्व न देता संस्कृतीची, विचारांची आदानप्रदान करणे हा त्यामागे मुख्य हेतू होता. तीच परंपरा आज महाराष्ट्र देशाने जपली आहे. यासाठी त्यांचे धन्यवाद. तसेच याठिकाणी कुठल्याही प्रकारचा कृतिमपणा जाणवला नाही. कोरोनाला शोभेल असा साधेपणा याठिकाणी पाहायला मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!