Share

शैक्षणिक ‘जगबुडी’पासून संजय राऊत आता तुम्हीच वाचवा, शेलारांची खोचक टीका

Published On: 

मुंबई – राज्यात सध्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला राज्यपालांसह भाजपा तसेच अन्य काही संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता शैक्षणिक संस्थाही या निर्णयाविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यास त्यांच्यावर ‘कोरोना बॅच’चा शिक्का बसेल. पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश तसेच नोकरीमध्ये त्यांना अडचणी निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी या परीक्षा घ्यायला हव्यात. त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यंदा रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका पुण्यातील काही शिक्षणसंस्थांनी घेतली आहे.

यानंतर देखील विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे, त्या परीक्षा घेण्याबाबत कोविड-19 प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबूक पेज लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जाहीर केले.

दरम्यान, अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. अशात विरोधकांकडून बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले कि, सुर्याचे ग्रहण सुटले विद्यार्थ्यांचे ‘ग्रहण’ काही सुटत नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अहंकाराचे ‘कंकण’ काही तुटत नाही. त्यामुळे एटीकेटीसह तमाम विद्यार्थी मित्र हो! चला आता ‘सरकारचे संकटमोचन’ शिवसेना नेते संजय राऊत यांचा धावा करु या! या ‘शैक्षणिक जगबुडी’ पासून तुम्हीच वाचवा!, अशी टीका त्यांनी केली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ संपवा, देवेंद्र फडणवीसांची आक्रमक मागणी

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?

तब्बल ४ लाख विद्यार्थ्यांना नापास करण्यामागे राज्य सरकार व पवार यांचा हेतू काय ?

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!