औरंगाबाद : शहरातील ७० कोविड केअर सेंटर्सला महापालिकेच्या अग्निशमन विभागाने अंतिम नोटीस बजावली आहे. यात अग्निशमन उपकरणे बसवण्याबाबत निर्वाणीचा इशारा दिला आहे. यासोबतच आता ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे.
पालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबईतील विरार येथील कोविड हॉस्पिटलच्या आगीच्या घटनेनंतर शहरातील सर्व कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेच्या अग्निशमन विभागाने औरंगाबाद शहरातील कोविड केअर सेंटर्स व हॉस्पिटलचे फायर ऑडिट केले. शहरात ७० कोविड केअर सेंटर्स व हॉस्पिटल आहेत. या सर्वांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. त्यात पालिकेचे अकरा कोविड केअर सेंटर्स आहेत, उर्वरित खासगी आहेत.
पाच ते सहा मोठे हॉस्पिटल वगळता अन्य ठिकाणी अग्नि सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर त्रुटी तपासणीत आढळल्या. काही ठिकाणी अग्निशमन उपकरणे होती, मात्र कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. काही ठिकाणी अग्निशमन उपकरणेच नसल्याचे निदर्शनास आले. पालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख आर.के. सुरे यांनी याविषयी स्पष्ट केले की, फायर ऑडिट करुन आता पंधरा ते वीस दिवस झाले आहेत. त्यामुळे सर्व कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलला सात दिवसांच्या मुदतीची अंतिम नोटीस बजावली आहे.
दर महिन्याला कोविड केअर सेंटर्स व हॉस्पिटलची फायर सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करा, असे शासनाचे आदेश आहेत, त्यानुसार आता तपासणीची दुसरी फेरी सुरु केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलचे फायर ऑडिट देखील सुरु केले आहे, अशी माहिती सुरे यांनी दिली. या ऑडिटचा एकत्रित तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- लातुरात कोरोना बाधितांचा आकडा ५४० वर!
- उस्मानाबादेत पहिला डोस झालेल्यांनाच मिळणार दुसरा डोस!
- ‘राजीव सातव यांच्या निधनाने बहुजन आणि वंचित समाजाचे फार मोठं नुकसान’
- परभणी मनपाचा ढिसाळ कारभार, उमेदवारांच्या मुलाखती अचानकपणे केल्या रद्द!
- ‘आधी पेट्रोल आणि आता खतांच्या दरात वाढ ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय’

