मुंबई: देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली. त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक सल्ला दिला. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी संताप व्यक्त करत इशारा दिला आहे.
“‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ही चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया महिलांचा उघड उघड अपमान करणारी आहे. त्यांनी आपले हे विधान मागे घ्यावे आणि केवळ सुप्रियाताईंचीच नव्हे, तर समस्त महिला वर्गाची बिनशर्त माफी मागावी अन्यथा…”, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
'घरी जा आणि स्वयंपाक करा' ही (चं.पा.) ची प्रतिक्रिया महिलांचा उघड उघड अपमान करणारी आहे. त्यांनी आपले हे विधान मागे घ्यावे आणि केवळ सुप्रियाताईंचीच नव्हे, तर समस्त महिला वर्गाची बिनशर्त माफी मागावी अन्यथा ..@abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @saamTVnews @CNNnews18
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 25, 2022
नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या.”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महापालिका निवडणुकीच्या आडून ओबीसी आरक्षण कायमसाठीच रद्द करण्याचा या सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडल्याशिवाय आम्ही कुणीच गप्प बसणार नाही. असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने हा संघर्ष पेटताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा”, चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना सल्ला
- “अमेरिकन कायदे खूप सैल आणि…”, ‘त्या’ घटनेवर पी. चिदंबरम यांची प्रतिक्रिया
- “एकीकडे महाराष्ट्रात साधूंना ठेचून मारलं जातं, दुसरीकडे…”, ‘मनसे’चा टोला
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : लखनऊचा खेळ खल्लास..! रजत पाटीदार ठरला बंगळुरूच्या विजयाचा हिरो
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : धमाकेदार पाटीदार..! लखनऊची धुलाई करत रजतनं रचला विक्रम; शतक ठोकलं आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

