मुंबई: राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून भाजप विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष पाहावयास मिळत आहे. देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली. त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली.
“तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या.”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महापालिका निवडणुकीच्या आडून ओबीसी आरक्षण कायमसाठीच रद्द करण्याचा या सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडल्याशिवाय आम्ही कुणीच गप्प बसणार नाही. असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने हा संघर्ष पेटताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अमेरिकन कायदे खूप सैल आणि…”, ‘त्या’ घटनेवर पी. चिदंबरम यांची प्रतिक्रिया
- “एकीकडे महाराष्ट्रात साधूंना ठेचून मारलं जातं, दुसरीकडे…”, ‘मनसे’चा टोला
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : लखनऊचा खेळ खल्लास..! रजत पाटीदार ठरला बंगळुरूच्या विजयाचा हिरो
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : धमाकेदार पाटीदार..! लखनऊची धुलाई करत रजतनं रचला विक्रम; शतक ठोकलं आणि…
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : राहुलसेनेला एकटा भिडला ‘शतकवीर’ पाटीदार..! बंगळुरूचा लखनऊसमोर २०७ धावांचा डोंगर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

