Share

३ दिवसांत आयटीआर भरा, नाहीतर दुप्पट दंड भरा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात सरकारकडून बँकांना तीन महिन्यांसाठी नागरिकांच्या कर्जाचे हप्ते वसूल न करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे आयकर विभागाने देखील आयटी रिटर्न भरण्याची मुदत सप्टेंबर आणि नोव्हेंबर अशी दोनदा वाढवून दिली होती.

त्यानंतर आता 2019-20 साठी आपले रिटर्न 31 डिसेंबरपर्यंत जमा करु शकतात असे यावेळी सांगण्यात आले होते.मात्र अनेकांच्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने  मुदत १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारी आधी शेवटच्या ३ दिवसांत आयकर विवरण सादर करण्यासाठी सध्या नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांची धावपळ सुरु आहे. अन्यथा करदात्यांना दुप्पट बिलंब शुल्क भरावे लागणार आहे.

आयकर विभागाने आतापर्यंत फाइल करण्यात आलेल्या ITR बाबत ट्वीट केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, आतापर्यंत AY 2020-21 साठी 5.16 कोटीपेक्षा अधिक जणांनी आयटी रिटर्न 6 जानेवारी 2021 पर्यंत दाखल केला आहे. तुम्ही केला नसेल तर कृपया तुमचा ITR AY 2020-21 आजच दाखल करा.

जर तुम्ही वेळेत आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला विभागाकडून दंड आकारला जातो. जर करदात्यांनी 10 जानेवारी 2021 नंतर आयटीआर फाइल केला तर त्यांना 10,000 रुपये लेट फी द्यावी लागेल. शिवाय ज्या करदात्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नाही त्यांना लेट फी च्या स्वरुपात 1000 रुपये द्यावे लागतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!