🕒 1 min read
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तर भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो!! महिन्याला १०० कोटी अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे ? बार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याच साठी केली होती का हो? यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी’ ! असा घणाघात लाड यांनी केला आहे.
अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो!! महिन्याला १०० कोटी?
अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे ?
बार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याच साठी केली होती का हो?
यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी!@TV9Marathi @abpmajhatv@BJP4Maharashtra— Prasad Lad (@PrasadLadInd) March 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारकडून पोलीस दलाचं खच्चीकरण, फडणवीसांचा टोला
- ‘अब बात निकल ही गई है तो फिर दूर तलक जायेगी’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- ‘पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती, महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली’
- अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, दरेकरांची मागणी
- भाजपने परमबीर सिंग यांना गृहमंत्र्यांवर खोटे आरोप करायला लावले, मिटकरींचे गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

