Share

भाजप जगातला सर्वात लुटारू पक्ष ; ममता बॅनर्जींचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला होता.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापताना दिसत आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांनीही शनिवारी एका सभेला संबोधित करताना भाजपवर पलटवार केला आहे. जगात भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असल्याचा घणाघात ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी हल्दिया येथील रॅलीला संबोधित केले. ‘भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष असून, नोटबंदीपासून ते बँकबंदीपर्यंत देशातील सामान्य नागरिकांना केवळ लुटण्याचे काम भाजपने केले,’ अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

‘पश्चिम बंगालची सत्ता भाजपला मिळता कामा नये. दंगलीचे षडयंत्र रचणे, हत्या करणे, दलित महिलांचे शोषण करणे अशा प्रकरणांमध्ये भाजपचे नाव वारंवार येत असते. बंगाली नागरिकांना दंगामुक्त राज्य हवे आहे. बंगालमध्ये शांतता नांदावी, असे वाटत असल्यास भाजपला मत देऊ नका,’ असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

तसेच ‘नोटबंदी, पीएम केअर फंड यांबाबत पारदर्शकता आणून काही गोष्टी स्पष्ट होणे आवश्यक आहे,’ असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!