Share

निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करा- उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई: निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असून निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच निवडणूक आयुक्त पदासाठी निवडणूक घ्या ? निवडणूक यंत्रणा चालवणारा आणि निवडणूक लढवणार पक्ष एकच असल्यामुळे पालघरच्या निवडणुकीत सगळा घोळ झाला, असेही ते म्हणाले. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेद घेतली.

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले ‘पालघर निवडणुकीत सुरुवातीपासूनच घोळ आहे. मग ती मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप असो, ईव्हीएममध्ये बिघाड असो वा आजच्या मतमोजणीतील आकडेवारीची तफावत असो. सर्वच पातळीवर निवडणूक यंत्रणा अपयशी ठरली आहे’. अशी टीका भाजप व निवडणूक आयोगावर केली.

भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांचा ४४,५८९ मतांनी पराभव केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!