🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भाजपसाठी संकटमोचक ठरणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या होमग्राउंड जळगावमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी पहायला मिळाली आहे. हाणामारी कार्यकर्त्यांमध्ये अथवा दोन वेगळ्यापक्षातील नेत्यांमध्ये झाली नसून भाजपच्याच जेष्ठ नेत्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यभरात भाजपसाठी संकटमोचक असणाऱ्या महाजन यांच्यावर आपल्या घरातील बंडखोरीचे संकट आले आहे.
अमळनेर येथे बुधवारी भाजपच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ट्रोल करण्यात येत आहे.
भाजपचे प्रवेशद्वार असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतर्गत मारामारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता…. सर्वांनी आनंद घ्यावा ही नम्र विनंती ????????#Jalgaon #Maharashtra #AbkiBaarKiskiSarkar ?? https://t.co/E6l1vPRUIz
— अतुल (@MrAtulPatil) April 10, 2019
भाजपा कार्यकर्ते अशा प्रकारची मारझोड करत असतील तर सुजाण नागरिक म्हणून आपलं एक कर्तव्य आहे कि
आपण खाली बसून घ्यावे….
जेणेकरून मागच्यानाही ते बघता येईल…!!!
असा आरडाओरडा चालला होता म्हणे तिथं??????#गिरीश_महाजन #बेदम_चोप #संकटमोचन
— नागरिक (@chetanNavale1) April 10, 2019
'माझ्या पेकाटात हळूच बसली लाथ'
"मी लाभार्थी, होय हे माझेच सरकार"
– "गिरीश महाजन" ???????????????? pic.twitter.com/8MQnwIFHYY
— Shreenivas Bikkad (@ShrinivasBikkad) April 10, 2019
लोक #कर्माची फळे भोगतात असे म्हणतात पण गिरीश महाजन यांनी काल #कमळाची फळे भोगली म्हणे…????????
असो मारहाणीचा #निषेध च भले जनतेला याचा आनंद जरी झाला असेल.
— Devendra Maratha (@DevTheMaratha) April 11, 2019
https://twitter.com/MilindSDarekar1/status/1116167795786391552
भाजपचा बंदूकबाज मंत्री गिरीश महाजन आता फायटर झाला. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतोय. अरेरेरेरेरे… काय काय ही दैन्यावस्था. वाल्याचा वाल्मिकी करता करता गुंडाची मांदियाळी झाली की हो!
मंत्री आहे की गुंड, गुंड मंत्र्याला तात्काळ अटक केली पाहिजे.
हा भाजपचा खरा चेहरा आहे— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 10, 2019
https://twitter.com/CMachindra/status/1116276708947025920
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

