Share

‘कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलाने नको’, चंद्रकांत पाटलांचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोल्हापूरकडे निघालेल्या किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील आहेत असा आरोप केला आहे. सोमय्यांच्या मागे भाजपाचे फार मोठे षडयंत्र आहे असे मुश्रीफ यांनी म्हटले होते. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

पुणे येथे बोलताना पाटील म्हणाले की, मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय शांत झोप लागत नाही. किरीट सोमय्या हे आरोप करत आहेत तर मग कोल्हापूर जिल्हा बंदची कारवाई कशासाठी ? असा सवाल त्यांनी केला. ईडीची लढाई करताना तोंडाला फेस येईल, त्यामुळे कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेने नको. येत्या दोन दिवसांत कॉंग्रेसच्या दोन बड्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांना दिला आहे.

‘ईडीला तोंड देणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. कारखान्यांमध्ये ज्या कंपन्यांमधून ९८ कोटी आले त्या कंपन्या कुठे आहेत यावर बोला. त्या कंपन्यांनी कोलकातामधून सेनापती घोरपडे कारखान्यात कशी गुंतवणूक केली त्यावर तुम्ही बोला. त्यामुळे मला मुश्रीफ यांना आवाहन करायचं आहे शांत डोक्याने काम करायचं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!