नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणात १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय अंतरिम आदेश देणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर सुनावणी पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, असं म्हणत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देण्यात येईल, अशी भूमिका न्यायालयानं मांडली.
महास्वयम पोर्टल असताना महाजॉब नावाचं पोर्टल कोट्यावधी रुपये खर्च करून का बनवलं ?
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरु झाल्यानंतरच यावर निकाल येणार आहे. न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी आपल्या बाजू ठोसपणे मांडल्या. मात्र, यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकूनच निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणावर खुल्या न्यायालयात सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केली. राज्य सरकारचे अधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षणाचे सर्व मुद्दे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मांडता येत नसल्याचा युक्तिवाद केला.
यावर खासदार संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘न्याय्य हक्कासाठी लढू आणि जिंकू सुद्धा ! प्रदीर्घ काळापासून सुरु असलेला मराठाआरक्षणाचा लढा पुढेही सुरुच राहील. आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणी करीता पुढील तारीख दिली. माझी महाराष्ट्र शासनाला सूचना आहे की, पुढच्या आठवड्यात किंवा त्याही पुढे होणाऱ्या आरक्षण संबंधित प्रत्येक सुनावणीला अधिक गांभीर्याने आपण सामोरे जायला पाहिजे’. अस संभाजीराजे म्हणाले आहेत.
तसेच जे कुणी विरोध करीत आहेत, त्यांनी सुद्धा समाजहित डोळ्यासमोर ठेऊन मराठा आरक्षणाला विरोध न करता पाठिंबा दिला पाहिजे. देशात सर्वात पहिले आरक्षण बहुजन समाजाला राजर्षी शाहू महाराजांनी दिले. तेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर राज्यघटनेत समाविष्ट केले. त्या आरक्षणात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. प्रचंड त्यागातून मिळवलेल्या मराठा आरक्षणाला कुणीही विरोध करू नये. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण इतर कुणाही समाजाचे हक्क हिरावून मिळाले नाही. असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.
देवस्थाने व मंदिरे तातडीने उघडण्याची भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
त्यामुळे बाकी सर्व समाज आज मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत. फक्त काही लोक या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करून घेत आहेत. त्यामुळे त्या सर्वांना माझी हीच विनंती असेल की, तुझं माझ न करता व्यापक समाजहित त्यांनी जपावं. आपण सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखात सोबत राहत आलो आहोत. यापुढेही तसेच राहू. अस देखील संभाजीराजे म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

