Share

देवस्थाने व मंदिरे तातडीने उघडण्याची भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना लॉकडाऊन मध्ये बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने उघडण्याची मागणी आज भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मंगलप्रभात लोढा म्हणतात की राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाले आहे. त्याअंतर्गत बाजारपेठ काही निर्बंधांसह पुन्हा हळू हळू सुरू होत आहेत. त्याचबरोबर राज्यात आणि शहरांत बस वाहतूक सुरू केली आहे. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार सरकार लवकरच हॉटेल आणि उपाहरगृहे सुरू करण्यास परवानगी देत आहे.

लोढा या पत्रात पुढे असे म्हणतात की भारतीय समाज देवाधर्माशी जोडला गेला आहे. आजच्या संकट काळात या समाजाला मानसिक धार्मिक आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे लोकांसाठी बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने सामाजिक अंतराचे ध्यान राखत खुली केली गेली पाहिजेत, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

लोढा यांनी लिहिलेल्या पत्राचा मसुदा पुढीलप्रमाणे

कोरोना संकटकाळाचे लॉकडाऊन (टाळेबंदी) हटवून आपण राज्यात मिशन बिगिन अगेन सुरू केले आहे. या मिशन बिगिन अगेन मधे बाजारपेठा काही निर्बंधांअधिन राहून हळू हळू सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे शहरांतर्गत व राज्यातील बस प्रवासी वाहतुकही टप्प्या टप्प्याने सुरू होत आहे. नुकताच राज्य सरकारने हॉटेल आणि उपाहारगृहे काही निर्बंधांतर्गत सुरू करण्याचा निर्णयही घेतल्याचे प्रसार माध्यमातून समजते आहे.

सोयाबीन बियाणे उगवण तक्रारींबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, कृषिमंत्र्यांनी खडसावलं

भारतीय समाज हा देवाधर्माभोवती बांधला गेलेला आहे. आज या संकटकाळात समाजाला भावनिक धार्मिक आधाराची देखिल खरी गरज आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात बंद करण्यात आलेली सर्व देवस्थाने सामाजिक आंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करत तातडीने उघडण्याची गरज आहे. त्यातून समाजाला मोठा मानसिक आधार मिळेल. त्यामुळे समाजासाठी बंद केलेली सर्व देवस्थाने योग्य ती काळजी घेत तातडीने उघडावीत अशी विनंती मुंबई भाजपातर्फे करत आहोत.या मागणीवर आपला सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही आशा आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!