टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पुणे शहरातील एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचे काही नेते नाराज आहेत. अशातच युतीकडून शहरातील प्रचाराचे नियोजन सुरु आहे. यामध्ये वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आहे.
भाजप आणि शिवसेना महायुतीच्या प्रचारासाठी जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना संपर्कप्रमुखांच्या पीएला एका शिवसेनेच्याचं पदाधिकाऱ्याने मारहाण केली. केली त्यामुळे या बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या घटनेचा प्रचारावर परिणाम झाला तर भाजपला धक्का बसू शकतो.
उपशहरप्रमुख किरण साळी यांनी ‘तुम्हाला उमेदवारी देतो, असे सांगून शिवसैनिकांकडून पैसे घेतले. शिवसैनिकांकडून पैसे घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? शहर शिवसेनेचे वाटोळे झाले आहे,’ त्या वेळी कदम यांचे पीए अतुल राजूरकर यांनी साळी यांच्याशी अरेरावीची भाषा केली. त्यानंतर हाणामारी झाली हा प्रकार खासदार गिरीश बापट, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर हा प्रकार घडला.
दरम्यान या नियोजन बैठकीला खासदार बापट, भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, रवी अनासपुरे यांच्यासह शिवसेनेचे कदम, शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख किरण साळी यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182530785099673600?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182527087019610113?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

