🕒 1 min read
मुंबई : मुंबई जिल्हा बँकेची चार जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण २१ जागांपैकी १७ जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. उरलेल्या चार जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मतदान केले. यावेळी उर्वरित जागांवर देखील सहकार पॅनलचाच विजय होईल, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला आहे.
याबाबत प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, “आज मुंबई जिल्हा बँकेच्या ४ जागांसाठी मतदान होत आहे. मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सहकार पॅनेलच्या १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित जागांवर देखील सहकार पॅनेल विजयी होईल असा विश्वास आहे.” असे दरेकर म्हणाले.
"आज मुंबई जिल्हा बँकेच्या ४ जागांसाठी मतदान होत आहे. मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सहकार पॅनेलच्या १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित जागांवर देखील सहकार पॅनेल विजयी होईल असा विश्वास आहे."#MumbaiBank pic.twitter.com/Ya58i0KINi
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 2, 2022
या निवडणुकीत १० हजार १९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चार जागांसाठी एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या आठही उमदेवारांमध्ये अटीतटीची लढाई सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदानाची प्रक्रिया सुरु राहील. निवडणूक प्राधिकरणाने मतदानासाठी शीव येथील साधना पूर्व प्राथमिक विद्यालय आणि डी. एस. हायस्कूलची निवड केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कैलास जेबले यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रचंड खटाटोप करण्यात आला. त्याला काही प्रमाणात यश मिळाले असून २१ जागांपैकी १७ जागांवर उमेदवारांची बिनिरोध निवड करण्यात आली. तर चार जागांवर एकमत न झाल्यामुळे येथे निवडणूक होत आहे. यावेळी कोणाचा गट सरस ठरणार आणि कोणाच्या पदरात अपयश पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मागील अनेक वर्षांपासूनन मुंबई बँकेच्या संचालकपदी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
महत्वाच्या बातम्या
- ऑडिओ क्लिप जाहीर करत नवाब मलिकांचा एनसीबीवर हल्लाबोल
- महाराष्ट्रात कोरोनाची तीसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा
- ‘… त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करताय’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “…पंतप्रधानांविरुद्ध गरळ, उसना आव आणि म्याव म्याव”, भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
- “म्हणजे मुल स्वतः जन्माला घालायची…”; सदाभाऊ खोतांची नवाब मलिकांवर बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
