🕒 1 min read
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत देखील भाष्य केले. राज्यातील लॉकडाऊन लगेचचं काढता येणार नाही. यासाठी आपल्याला हळूहळू पाऊलं उचलावी लागतील. जसा अचानक लॉकडाऊन घोषित केला नाही तसा लॉकडाऊन अचानक काढता येणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 33 हजार आहे. तर आतापर्यंत 13 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोना वाढत असला तरी त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले आहे. आज बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण कोरोनावर मात करत आहेत, असे ठाकरे म्हणाले.
तसेच केंद्राच्या पथकाने मे महिन्याच्या अखेरीस दीड लाख कोरोनाचे रुग्ण वाढतील असा अंदाज दिला होता. मात्र आपण सर्वांनी घरी बसून हा अंदाज खोटा ठरवला. राज्यात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. कोरोनाहे अचानक आलेले संकट असल्याने यासाठी आपल्या वैद्यकीय यंत्रणा तयार नव्हत्या. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचार मिळाला नाही. हेळसांड झाली. मात्र आता वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत. आज अनेक ठिकाणी उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वांना माफक दारात उपचार मिळणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान लॉकडाऊन अचानक उठवता येणार नाही. आपण हळूहळू सर्वकाही सुरु करत आहोत. अनेक उद्योगांना आणि व्यवसायांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे सर्वकाही सुरु करणार आहोत. आज रेड झोन वगळता इतर भागात आर्थिक व्यवहार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे अचानक लॉकडाऊन घोषित केला नाही त्याप्रमाणे लॉकडाऊन अचानक काढता देखील येणार नाही. एक पाऊल उचलून आपल्याला सर्वकाही पूर्वपदावर आणायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- मुस्लीम बांधवांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा. कुठेही गर्दी करू नका. घरातूनच आपली प्रार्थना करा आणि प्रार्थनेमध्ये महाराष्ट्रासाठी दुवा करा.
- महाराष्ट्रात 33 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 13 हजार रुग्ण हे आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे केंद्राचा दीड लाख रुग्ण असतील हा अंदाज आपण सर्वांनी घरी बसून खोटा ठरवला आहे. आपण कोरोनावर मात करत आहोत.
- बरे होणाऱ्यांचे प्रमाण आज वाढले आहे. आज बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण कोरोनावर मात करत आहेत.
- पुढची परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांचा गुणाकार हा वाढण्याची शक्यता आहे.
- कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटामुळे अनेकांना उपचार मिळत नाही हे खर आहे. मात्र आता आपण आपल्या वैद्यकीय सुविधेमध्ये अमुलाग्र प्रगती केली आहे.
- सध्या आपल्याकडे 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. तर पुढच्या महिन्यात आणखी 13 हजार बेड उपलब्ध होणार आहेत.
- सध्या रक्तपेढ्यांमध्ये रक्त कमी पडत आहे. त्यामुळे रक्तदान करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
- थकवा जाणवत असेल, ताप येतोय, वास येण जाणवत नाहीये, असे काही होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही कोरोनाची नवी लक्षणंं आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- आज शिवथाळीच्या माध्यमातून लाखो लोक 5 रुपयात जेवत आहेत. अनेक ठिकाणी मोफत उपचार दिले जात आहेत.
- आतापर्यंत 481 ट्रेन राज्यातून परराज्यात सोडल्या आहेत. तर आतापर्यंत 6 ते 7 लाख घरी गेली आहेत.यासाठी 85 कोटी रुपये दिले.
- एसटीच्या माध्यमातून आज 3 लाखजणांना घरी पोहचवल आहे. यासाठी 75 कोटी खर्च केला.
- अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.
- सर्व काही हळूहळू सुरळीत होणार आहे. उद्योग, यंत्रमागावरील उद्योगांना परवानगी दिली आहे. एस टी ला वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.
- चित्रीकरणासाठी देखील निर्णय होत आहे. अनेकांशी बैठका सुरु आहेत. त्यामुळे लवकरच चित्रीकरणाला देखील परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल,
- हा संकटाचा काळ आहे. कोणीही राजकारण करू नये. आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. सध्या माणुसकी धर्म महत्वाचा आहे, त्यामुळे मी राजकारण करणार नाही, तुम्हीही करू नका.
- लॉकडाऊन हो किंवा नाही असे म्हणून काढता येणार नाही. आपल्याला हा लॉकडाऊन हळूहळू काढावा लागेल. अचानक काढता येणार नाही. त्यामुळे घाई करून चालणार नाही.
- आपल्याला कोरोनाबरोबर जागाव लागणार आहे. आपल्यला मास्क घालून समाजात वावरायला लागेल. सतत हात धुवावे लागतील.
- कोरोना काही चांगल्या गोष्टी देखील शिकवत आहे. आपल्याला आता इथून पुढे स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका.
महत्वाच्या बातम्या
FB Live : विरोधकांना घेतले फैलावर, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले….
#corona : येत्या 15 जून पर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता, वर्षा गायकवाडांनी दिले संकेत
…तर मुख्यमंत्र्यांना ‘मंत्रीकपात’ करावी लागेल, संजय राऊतांनी व्यक्त केली भीती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
