मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. तुम्ही कितीही राजकारण केले तरी आम्ही राजकारण करणार नाही. आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. तुम्ही कितीही ओरडलात तरी आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहू, असे ठाकरे म्हणाले.
विरोधकांनी महाराष्ट्र बचाओ आंदोलन करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. ते म्हणाले की, ही वेळ राजकारणाची नाही. वेळ मानवता धर्म पाळण्याची आहे. त्यामुळे तुम्ही कितीही ओरडलात तरी आम्ही काम करत राहू. आमच्याकडून कोणतेही राजकारण होणार नाही, कारण आम्हाला अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्या पार पाडायच्या आहेत. केंद्राकडून काही मदत मिळत आहे. मात्र अजूनही रेल्वेच्या तिकिटाचे पैसे, GSTचा परतावा अनेक गोष्टी मिळाल्या नाही. तरीही आम्ही आरडाओरडा करत नाही
तसेच आर्थिक पॅॅकेजबाबतही उद्धव ठाकरे म्हणाले की. आर्थिक पॅॅकेज दिले नाही असे विरोधक म्हणत आहेत. मात्र आधी राज्यावर आलेले संकट आपण टाळू. हे संकट गेल्यानंतर आर्थिक पॅॅकेजचं बघू. अनेकांनी लाखो करोडो रुपयांचे पॅॅकेज जाहीर केले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. आम्ही कुठेही जाहिरातबाजी करत नाही. आमची कामं सुरूच आहेत. आतापर्यंत 481 ट्रेन राज्यातून परराज्यात सोडल्या आहेत. तर आतापर्यंत 6 ते 7 लाख घरी गेली आहेत.यासाठी 85 कोटी रुपये दिले. तसेच एसटीच्या माध्यमातून आज 3 लाखजणांना घरी पोहचवल आहे. यासाठी 75 कोटी खर्च केला. आता अजून कोणते पॅॅकेज हवे आहे.
आज शिवथाळीच्या माध्यमातून लाखो लोक 5 रुपयात जेवत आहेत. अनेक ठिकाणी मोफत उपचार दिले जात आहेत. हे देखील पॅॅकेज आहे. महाविकास आघडीचे सरकार हे केवळ पोकळ आश्वासन देत नाही. तर ते जाहिरातबाजी न करता प्रत्यक्ष काम करत आहे, असा टोलाही ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- मुस्लीम बांधवांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा. कुठेही गर्दी करू नका. घरातूनच आपली प्रार्थना करा आणि प्रार्थनेमध्ये महाराष्ट्रासाठी दुवा करा.
- महाराष्ट्रात 33 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 13 हजार रुग्ण हे आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे केंद्राचा दीड लाख रुग्ण असतील हा अंदाज आपण सर्वांनी घरी बसून खोटा ठरवला आहे. आपण कोरोनावर मात करत आहोत.
- बरे होणाऱ्यांचे प्रमाण आज वाढले आहे. आज बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण कोरोनावर मात करत आहेत.
- पुढची परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांचा गुणाकार हा वाढण्याची शक्यता आहे.
- कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटामुळे अनेकांना उपचार मिळत नाही हे खर आहे. मात्र आता आपण आपल्या वैद्यकीय सुविधेमध्ये अमुलाग्र प्रगती केली आहे.
- सध्या आपल्याकडे 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. तर पुढच्या महिन्यात आणखी 13 हजार बेड उपलब्ध होणार आहेत.
- सध्या रक्तपेढ्यांमध्ये रक्त कमी पडत आहे. त्यामुळे रक्तदान करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
- थकवा जाणवत असेल, ताप येतोय, वास येण जाणवत नाहीये, असे काही होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही कोरोनाची नवी लक्षणंं आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- आज शिवथाळीच्या माध्यमातून लाखो लोक 5 रुपयात जेवत आहेत. अनेक ठिकाणी मोफत उपचार दिले जात आहेत.
- आतापर्यंत 481 ट्रेन राज्यातून परराज्यात सोडल्या आहेत. तर आतापर्यंत 6 ते 7 लाख घरी गेली आहेत.यासाठी 85 कोटी रुपये दिले.
- एसटीच्या माध्यमातून आज 3 लाखजणांना घरी पोहचवल आहे. यासाठी 75 कोटी खर्च केला.
- अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.
- सर्व काही हळूहळू सुरळीत होणार आहे. उद्योग, यंत्रमागावरील उद्योगांना परवानगी दिली आहे. एस टी ला वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.
- चित्रीकरणासाठी देखील निर्णय होत आहे. अनेकांशी बैठका सुरु आहेत. त्यामुळे लवकरच चित्रीकरणाला देखील परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येईल,
- हा संकटाचा काळ आहे. कोणीही राजकारण करू नये. आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. सध्या माणुसकी धर्म महत्वाचा आहे, त्यामुळे मी राजकारण करणार नाही, तुम्हीही करू नका.
- लॉकडाऊन हो किंवा नाही असे म्हणून काढता येणार नाही. आपल्याला हा लॉकडाऊन हळूहळू काढावा लागेल. अचानक काढता येणार नाही. त्यामुळे घाई करून चालणार नाही.
- आपल्याला कोरोनाबरोबर जागाव लागणार आहे. आपल्यला मास्क घालून समाजात वावरायला लागेल. सतत हात धुवावे लागतील.
- कोरोना काही चांगल्या गोष्टी देखील शिकवत आहे. आपल्याला आता इथून पुढे स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका.
महत्वाच्या बातम्या
#corona : येत्या 15 जून पर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता, वर्षा गायकवाडांनी दिले संकेत
…तर मुख्यमंत्र्यांना ‘मंत्रीकपात’ करावी लागेल, संजय राऊतांनी व्यक्त केली भीती
#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

