Share

…तर मुख्यमंत्र्यांना ‘मंत्रीकपात’ करावी लागेल, संजय राऊतांनी व्यक्त केली भीती

Published On: 

मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांची सामनाच्या रोखठोक सदरातून मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात कपात करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. कोरोनामुळे आज अनेक मंत्री हे निवांत बसून आहेत. मलईदार खात्याचे मंत्री देखील रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्या यांच्यातील शांतता हतबलताच दाखवत आहे, हे असेच सुरु राहिले, तर मुख्यमंत्र्यांना मंत्रीकपात करावी लागेल, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.

वाचा काय म्हणत्यात राऊत रोखठोक मधून ?

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढणे हे देशाला परवडणारे नाही असे मी एका वरिष्ठ अधिकाऱयास सांगितले तेव्हा त्याने मिश्कील भाष्य केले, ”मंत्रालयातही अनेकांच्या हातांना काम नाही. तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? ‘कोरोना’मुळे आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांचा मोठा गट कामाच्या प्रतीक्षेत रांगेत उभा आहे. त्यांना काम हवे आहे व तो त्यांचा हक्कच आहे.”

मागेल त्याला काम ही आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा आहे, पण त्यासाठी काम सुरू व्हायला हवे. महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्हय़ांत ‘कोरोना’ लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी त्यांची सध्याची अवस्था आहे. जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱयांतील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल.

वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करावे आणि सुरक्षित राहावे हा विचार वाढतो आहे. घरातून काम करणाऱयांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल असा इशारा ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांनी दिला आहे. तो खरा मानला तर ‘कोरोना’ काळात राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला हे जाणवू लागले आहे. लोकांनी विरोधकांना घरी बसवले व संकटकाळात ते सरकारविरोधात काम करीत आहेत. मुख्यमंत्री ‘टाळेबंदी’च्या बाबतीत कठोर आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढू नये ही त्यांची भूमिका तर शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते निर्बंध शिथिल व्हावेत, लोकांनी हळूहळू स्वतःची सुरक्षा सांभाळून कामधंद्यास लागावे या मताचे आहेत. या सगळय़ा पेचात जनता अधूनमधून अस्वस्थ मनाचा उद्रेक घडवीत आहे. देशातील सर्वच राज्यकर्त्यांना एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्र बोलवावे आणि अंध गायक के. सी. डे यांची ती ध्वनिमुद्रिका ऐकवावी

किंवा स्वतः गाऊन सांगावे…
बाबा, मन की आँखे खोल
मतलब की सब दुनियादारी
मतलब के सब है संसारी…

महत्वाच्या बातम्या

‘आंदोलनातून भाजपानं दुहीची बीजं पेरली, जनता माफ करणार नाही’

#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात

‘नेटफ्लिक्स’ च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!