🕒 1 min read
टीम इंडियाला धक्का : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच्या जागी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला. त्यात भर म्हणून गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही वन डे मालिकेतून माघार घेतली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत झालेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमार जखमी झाला. त्याला पुन्हा हर्नियाचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. भुवनेश्वरच्या जागी आता एका मुंबईच्या खेळाडूला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळणार आहे.येत्या १५ डिसेंबर दोन्ही संघादरम्यानची वनडे मालिका सुरु होत आहे.
याआधी ऑगस्ट महिन्यातही भुवनेश्वरला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघातून बाहेर होता. विंडीजविरुद्ध टी20 मालिकेत तो खेळला पण आता दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अद्याप त्याच्या दुखापतीबद्दल संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआय़कडून सांगण्यात आलेलं नाही.
दरम्यान, आगामी वनडे मालिकेसाठी भुवनेश्ववर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. भारताकडे एकापेक्षा एक सरस गोलंदाज असताना शार्दुल ठाकूर संघात स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205803648053215232?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205803536463740930?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
