मुंबई : शेतकरी कायद्यां विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक होऊन प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या वतीने काल किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंद करण्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. यामुळे केंद्र सरकार अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. ‘केंद्र सरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही केंद्राची चूक आहे. शेतकरी कधीही थकणार नाही. त्यामुळे वेळ गेलेली नाही. चर्चा करा आणि कायदे रद्द करा.’ असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
देशात तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे. भारत बंदच्या आवाहनाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही. याबाबत पक्षांतर्गत चर्चा करून त्यामध्ये सहभागी होण्याबाबतचा निर्णय होईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
नवीन कायदा करण्याचा अधिकार सरकारला असतो. लोकांना विश्वासात घेऊन कायदा केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर कायदा बदलून नवीन कायदा करता आला असता पण एकही पाऊल मागे घेणार नाही ही केंद्राची भूमिका राहिल्यामुळे शेतकरी आंदोलन लांबले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामविकास मंत्र्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांसोबत साजरा केला ‘बैलपोळा’!
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गांची घंटा वाजली!
- राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक बुधवारी; शरद पवार स्वतः घेणार आढावा


