Share

….कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांना त्रास होऊ नये : देवेंद्र फडणवीस

Published On: 

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. विनाकारण शेतकऱ्यांना त्रास दिल्याचे लक्षात आल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाईल. उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते चंद्रपूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत बोलत होते.

या बैठकीला राज्याचे वित्त, नियोजन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर-गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार संजय धोटे, कीर्तीकुमार भांगडिया, आमदार सुरेश धानोरकर, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, मुख्यवनसंरक्षक मुकूल त्रिवेदी त्रिवेदी आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील खरीप पिक कर्ज वाटपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. काही बँकांच्या उद्दिष्टांपैकी फारच कमी कर्ज वाटप झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उपस्थित अधिकाऱ्यांना वाटपाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. बँकांकडे मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला असतानाही पात्र शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात कर्ज वाटप झालेले नाही. या हंगामासाठी खरीप कर्ज मिळण्यामध्ये त्यांना अडचणी कशा? अशी विचारणा त्यांनी केली. जुलै महिना सुरू असतानाही बँकेमधून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे कर्ज वाटपात गती घ्यावी व उद्दिष्टाप्रमाणे कर्ज वाटप व्हावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात कुचराई करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

पीक विमा योजने संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार कमी पैशाचे धनादेश मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना उचित पद्धतीने पीक विमा मिळावा या संदर्भात नियोजन करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या जिल्ह्यातील उद्दिष्टामध्ये अतिरिक्त पाच हजारांची वाढ करण्याचे नियोजन करा, असे निर्देश त्यांनी दिले.

गोसी खुर्द प्रकल्पातून होत असलेल्या कालव्यामार्फतच्या सिंचनाची स्थिती व उद्दिष्टपूर्ती बद्दलही त्यांनी जाणून घेतले. अनेक ठिकाणी प्रकल्पाची कामे करताना काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये बराच वेळ जात असल्याबाबत तक्रारी राज्यभरातून येत आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया तातडीने मार्गी लागण्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मामा तलावाच्या संदर्भामध्ये निधीची कमतरता असेल तर प्रस्ताव पाठविण्याबाबत आणि जिल्ह्यातील अनेक समस्यांचा कालमर्यादेत निपटारा करण्याबाबतचे निर्देश दिले. जिल्ह्यातील बंद पडलेल्या खाणीबाबत पोलिस विभागाने अधिक दक्षतेने काम करण्याची मागणी भद्रावतीचे आमदार सुरेश धानोरकर यांनी केली. त्यांच्या परिसरातील कर्नाटक एम्टा खाणीमधील कोळशाच्या चोरीचा व पुनर्जिवीत करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा पोलिस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये 13 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे आढावा घेण्यात आला होता. या बैठकीमध्ये दिंडोरा प्रकल्पाच्या संदर्भात देण्यात आलेल्या निर्देशानुसार 34 कोटी रुपये मदतीसाठी प्रस्तावित केले असून हा निधी तातडीने वितरीत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज निर्देश दिले. बाबुपेठ, राजूरा,वरोरा नाका उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे २४ कोटी ८० लाख देण्याची मागणी : ए.टी.नाना पाटील

सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – मुख्यमंत्री

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!