सोलापूर : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.
विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या १ दिवसाच्या दौऱ्यामध्ये ते अक्कलकोटमधील गावांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर देत आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर शेतीचं झालेलं नुकसान बघावं आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी नुकतंच सांगवी गावाची नदी पुलावरून पाहणी केली. या गावात संपूर्णतः पुराचं पाणी आल्यानं मोठं नुकसान झालं आहे. पिकाचं काय घेऊन बसला शेतीतील मातीच्या माती वाहून गेलीये अशी हतबल भावना या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळं ठाकरेंनी गावातील बांधावर येऊन पाहणी करावी अशी मागणी करत रोष व्यक्त केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर देत तुम्ही जीवाचं काही बरं-वाईट करू नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे, असं आश्वासन दिलं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कालपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी येत्या १० दिवसांत मोदींची भेट घेणार असल्याचं सांगितलं. महाविकास आघाडीतील विविध मंत्र्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- ६ महिन्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय?
- कोश्यारींना स्वाभिमान असेल तर त्यांनी पदावर राहायचं की नाही हे ठरवावं ; पवारांचा हल्लाबोल


