टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.
अतिवृष्टीग्रस्तांना गुंठ्याला 80 रुपये जाहिर केलेली तोकडी मदत राज्यपाल व पंतप्रधानांना प्रत्येक शेतकरी परत पाठविणार आहे. प्रति एकर 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या. पिकविमा न मिळण्याच्या विरोधात 25 नोव्हेंबरपासून किसान सभा राज्य़भर आंदोलन करणार असल्याचा इशारा अजित नवले यांनी दिला आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1196680459406598144?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1196677029149597696?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1196675297430495232?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

