नागपूर – नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. आठवडाभरापूर्वी म्हणजेच 11 जून रोजी नागपुरातील एका अज्ञात व्यक्तीने जनतेचा विश्वासदर्शक ठराव या आशयाची एक आॅनलाईन पिटीशन सुरु केली होती. आठवडाभरातच या पिटीशनवर तब्बल एक लाखापेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षर्या केल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जाधव व विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाचा इशारा दिला होता.
त्याच दरम्यान नागपूरातील काॅंग्रेस नेत्यांनी मुंढे यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ही आॅनलाईन पिटीशन सुरु करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे नागपुरात कोरोना आटोक्यात आल्याचे या याचिकेत म्हटले आहे. शिवाय लाॅकडाउनच्या काळात महानगरपालिकेने मुंढे यांच्या नेतृत्वात उत्कृष्ट काम केल्याचा विश्वास नागपुरकरांनी व्यक्त केला आहे.
नागपूरातील भाजप व काॅंग्रेसचे काही ठरावीक नेते व महानगरपालिकेतील काही अधिकारी व काॅन्ट्रक्टर मुंढे यांच्या बदलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळतेय. त्या पार्श्वभुमीवर नागपूरकरांनी मुंढे यांच्या पाठीशी भक्कम समर्थन उभे केले आहे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची तयारी असल्याचे त्यांचे अनेक समर्थक सांगतात.
महापौर संदीप जोशी बॅकफुटवर
मुंढे यांना लाखभर नागरिकांनी पाठिंबा दिल्यानंतर महापौर संदिप जोशी काही अंशी बॅकफुटवर गेल्याचे पहायला मिळते. लोकशाहीत प्रत्येक नागरीकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र या अभियानात बाहेरचे लोक किती व नागपूरकर किती हे पहावे लागेल असे ते म्हणाले.
काॅंग्रेसची संयमी भूमिका
मुंढे यांच्या बदलीच्या मुद्यावरुन काॅंग्रेसमध्ये मतभेद असल्याचे चित्र आहे. शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांची भूमिका आक्रामक असली तरी काॅंग्रेसच्या इतर गटातील नेते मात्र शांत आहेत. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या भूमिकेला पक्षातीलच नगसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. नगरसेवक प्रफुल गुडधे हे मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असले तरी त्यांच्या बदलीसाठी आग्रही नाही. नगरसेवक कमलेश चौधरी व बंटी शेळके यांनी उघडपणे मुंढे यांची बाजू घेत त्यांच्या बदलीला विरोध असल्याचे सांगितले. भाजपकडून तुकाराम मुंढे यांचा सर्वाधिक विरोध होत असतांना काॅंग्रेसने संयमी भूमिका घ्यावी असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. भाजप विरोधात उसळणारा जनक्षोभ हा काॅंग्रेसच्या पथ्यावर पडेल असेही त्यांना वाटते.
भाजपमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सत्तारुढ पक्ष नेत्यांसह ज्येष्ठ नगरसेवक मुंढे यांच्या विरोधात आक्रामक असले तरी अनेक नगरसेवकांनी खासगीत या भूमिकेला विरोध केला आहे. भाजपने जर अशीच आक्रामक भूमिका ठेवली तर पक्षाला नुकसान होईल व जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
सोशल मिडीयावर मुंढे सुपरहिट
राजकीय नेत्यांचा मुंढे यांना विरोध असला तरी सामान्य नागपूरकरांनी मात्र त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. फेसबूक, ट्विटर, वाॅट्स अॅप, इंस्टाग्राम या समाजमाध्यमांवर त्यांच्या चहात्यांनी समर्थन मोहिम सुरु केली आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या – भाजपा
कोकणाचे हरवलेले वैभव आणि आर्थिक सुबत्ता कोकणाला पुन्हा मिळवून देऊ – दरेकर
गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय सर्वांसाठी अनुकरणीय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

