तुळजापूर – तालुक्यातील अणदूर गावा जवळील महामार्गावर ईनोव्हा गाडीतुन 97किलो गांजा घेवुन जाताना दोघांना अटक करण्यात आली आहे. उपपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन तब्बल 3469200रुपयचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई गुरुवार दि18 रोजी करण्यात आली .या बाबतीत अधिक माहीतीअशी की,पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन,अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ दिलीप टिपरसे सोबत सपोनि राऊत,सपोनि शरदचंद्र रोडगे,नायब तहसीलदार भारती,सपोफौ सातपुते,पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक रवी राऊत, कोष्टी,सोनवणे,हजारे,पोलीस कॉन्स्टेबल माली व कोलारे यांनी अणदूर गावाजवळ सोलापूर जाणारे महामार्गावर वाहन क्रमांक MH 25 AL 9199 इनोव्हा गाडी पकडली.
यात बाळासाहेब परबत रा. तडवळे ता माढा .सोमनाथ कदम रा. कदमवस्ती ता. मोहोळ हे त्यांचे कब्जात बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ गांजा 97 किलो कि.अं.19,59,200 रु चा वाहतूक करताना मिळून आले . त्यांचेकडे गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 34,69,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलीस ठाणे नळदुर्ग येथे NDPS कायद्याअंतर्गत सपोनि राऊत यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून त्याचा तपस सपोनि चव्हाण हे करीत आहेत.
मुलाच्या लग्नाची पार्टी भोवली; कॉंग्रेस नेत्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या अडचणी वाढल्या
दिशाच्या शुभेच्छांच्या स्पेशल ट्वीटला आदित्य ठाकरेंनी केला ‘हा’ रिप्लाय
अजब कारभार… आता कोरोना रिपोर्ट थेट रुग्णांना मिळणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

