औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील औराळा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या गट क्रमांक ३११ असलेल्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि.१२ पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. अशोक भाऊसाहेब जिवरख असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अशोक भाऊसाहेब जिवरख यांच्यावर महिंद्रा फायनान्सचे घर कर्ज, विविध कार्यकारी सोसायटीचे मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्या सर्व कर्जाची उलटापालट करायची असल्याने पैसे नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून ते त्याच विवेचनात होते. गुरुवारी रोजच्या नित्यनेमाने प्रमाणे ते पहाटे जनावराचे शेण व चारापाणी करुन शेताकडे शौचालयास गेले.
बराच वेळ झाला तरी वडील घरी का आले नाही म्हणून त्यांचा मुलगा बाळासाहेब जिवरख शेतात बघण्यासाठी गेला असता त्यांना वडील अशोक जिवरख हे मृतावस्थेत दिसले. नातेवाईकांनी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणला असता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. देवगाव रंगारी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रेट भेट! सलमानने शेअर केले मीराबाईसोबतच्या भेटीचे फोटो
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

