मुंबई : कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) करंडक जिंकण्यासाठी बेताब आहे. कोलकाता नाइट रायडर्स या संघाने सहा वर्षांपूर्वी ट्रॉफी जिंकली होती. केकेआर आयपीएलच्या तीन संघांपैकी एक आहे ज्यांच्या नावावर एकापेक्षा जास्त वेळा आयपीएल करंडक आहे. सर्वाधिक वेळा जेतेपद मिळविण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्स पाच वेळा आयपीएल चॅम्पियन आहे. मुंबईशिवाय चेन्नई सुपर किंग्ज तीन वेळा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. केकेआरने दोनदा आयपीएल करंडक जिंकला आहे.
केकेआर 2014 मध्ये आयपीएल जिंकले होते. त्यानंतर, संघ एकदादेखील अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. गेल्या हंगामात केकेआरने पाचवे स्थान मिळविले. आयपीएलच्या 13 व्या सत्रात केकेआरने खराब फॉर्म आणि त्याच्या खेळाडूंच्या दुखापतीसह संघर्ष केला.
दिनेश कार्तिकने हंगामातील मध्यभागी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर इयन मॉर्गनला संघाची कमान देण्यात आली. पण तरीही संघाचे भाग्य बदलले नाही. मॉर्गनच्या नेतृत्वात केकेआरने 7 पैकी 3 सामने जिंकले.
I hope so. I want to start drinking coffee in that only! https://t.co/s9UvyY2QdV
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 31, 2021
आयपीएलच्या 14 व्या मोसमात केकेआरचे भाग्य बदलतील की नाही, हे आता येणारी वेळच सांगेल. पण केकेआरचा मालक शाहरुख खानने आयपीएल कपसाठी वेगळी तयारी केली आहे. त्याने एका चाहत्याला एक मजेदार उत्तर दिले आहे. एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, केकेआर यावेळी कप आणेल. यावर शाहरुख म्हणाला की आशा आहे … मी त्यात कॉफी पिण्यास सुरूवात करीन.
महत्त्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी भडकले
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

