नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारी झालेल्या भेटीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भेटीबाबतचा खुलासा केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी या भेटी मागचं कारण स्पष्ट केलं आहे.
कालची बैठक केवळ ओबीसी आरक्षणासाठीच होती. यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा नव्हती. असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच, न्यायालयात आरक्षण टिकावे यासाठी काल आपण काही सूचना केल्या असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे.
‘कालची बैठक ओबीसी आरक्षणासाठीच! न्यायालयात आरक्षण टिकावे, यासाठी काही सूचना केल्या आणि त्या स्वीकारल्या तर मला खात्री आहे की हे आरक्षण टिकेल’, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरूवारी सविस्तर चर्चा झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्यातील भेटीवरून पुन्हा एकदा विविध राजकीय चर्चा रंगत असताना, आज नागपुरात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीबाबत माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ओशो आश्रमातील गैरकारभाराची सरकारने चौकशी करावी; ओशो अनुयायांची आठवलेंकडे मागणी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार


