अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती जास्त वाटते, अशी वक्तव्य केल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे आता पारनेरमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवून पहाटे फडणवीसांचा शपथविधी होवू शकतो, रात्रीच्या अंधारात झाडे कापली जाऊ शकतात, पंतप्रधान फक्त तीन तास झोपून भारत सरकारचे २६ सार्वजनिक सरकारी उपक्रम विकू शकतात, तर मग मुंबई महानगरपालिकेने अगोदर नोटीस देवून, कंगणाचे अनधिकृत बांधकाम तोडले तर, त्यात गैर काय? असे मत पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी व्यक्त केले असून त्यांनी कंगना राणावत व भाजपवर टीका केली आहे.
कंगना राणावत ही अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस व मुंबईचा अपमान करत आहे. तसेच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे तिच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन पारनेर तालुका शिवसेनेच्यावतीने तहसिलदारांना देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीनेच कंगना राणावतला बळ दिले आहे. त्यामुळे कंगना राणावतवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी सभापती गणेश शेळके यांनी केली आहे. यावेळी सभापती गणेश शेळके यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य डॉ.श्रीकांत पठारे, विजय डोळ, उपशहर प्रमुख संदीप मोढवे तसेच तालुक्यातील अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अजित पवारांनी भरला दम !
- वीर सावरकरांवर काँग्रेसने घृणास्पद आरोप केले तेव्हा उद्धव ठाकरे शांत राहिले आणि आता…
- काँग्रेसमध्ये मोठे बदल, गुलाम नबी आझाद, खरगे यांची महासचिवपदावरून पायउतार


