Share

काँग्रेसमध्ये मोठे बदल, गुलाम नबी आझाद, खरगे यांची महासचिवपदावरून पायउतार

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. काँग्रेस वर्किंग कमेटीपासून ते राज्यांचे प्रभारी महासचिव देखील बदलण्यात आले आहेत. तसेच काँग्रेसच्या अंतर्गत संघटन निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा आणि लुजिन्हो यांना संघटनेच्या महासचिव पदावरून हटविण्यात आले असून याशिवाय आशा कुमारी, अनुग्रह नारायण सिंह, गौरव गोगोई आणि रामचंद खुंटिया यांना देखील प्रदेश प्रभारी पदावरून हटविण्यात आले आहे.

 

सोनिया गांधींनी नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते मधूसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या अंतर्गत सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीची घोषणा केली आहे. याशिवाय अध्यक्षाला कामकाजात मदत करण्यासाठी स्पेशल कमिटी स्थापन्यात आली असून, यामध्ये अहमद पटेल, एके एंटनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, के सी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे – अतुल भातखळक

पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन युवक काँग्रेस राज्यात बळकट करणार- अमित झनक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!