Share

‘राज्यात कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत याचं फडणवीस-दरेकरांना वाईट वाटत आहे’

Published On: 

अहमदनगर : ‘सरकार अडचणीत यावे यासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर ही मंडळी देव पाण्यात घालून बसली आहेत. खरंतर करोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. करोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत त्याचं फडणवीस, दरेकर यांना वाईट वाटत आहे. हे चुकीचं आहे, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

गौतम गंभीरने दिल्ली सरकारवर केली टीका म्हणाला, ‘दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय’

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. करोनाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला. विशेषतः फडणवीस-दरेकर या जोडगोळीवर त्यांनी टीका केली.

फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले, ‘फडणवीस हे मुख्यमंत्री झाले म्हणून सिनियर झाले. नाहीतर ते माझ्याच सोबतचे आहेत. उलट १५ वर्ष मी मंत्री होतो. फडणवीस तर काहीच नव्हते, ते डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. प्रत्येक जण पंतप्रधान आणि प्रत्येक जण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. ते नशिबातच लागते’, असा टोमणा मारायला देखील ते विसरले नाहीत.

‘मी फडणवीसांना माझ्याकडं असलेलं ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हे पुस्तक दिले होतं ते त्यांनी वाचलं नसावं. मौन पाळल्यामुळंच मनाला शांती लाभते. प्रतिकूल काळात अध्यात्म हाच उपाय आहे, हे फडणवीसांनी लक्षात घ्यावं,’ असंही मुश्रीफ म्हणाले.

आता मनसेनेही पुकारला एल्गार, राज्यशासनाच्या विरोधात करणार अनोखे आंदोलन

दरेकरांचा समाचार घेताना ते म्हणाले, ‘राज्य सरकार मोठ्या प्रमाणात तपासणी करीत नाही असं दरेकर म्हणतात. पण आम्ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या आयसीएमआरच्या निर्देशानुसारच काम करतो. त्यामुळं त्यांनी रुग्णांच्या तपासणीबाबत आम्हाला विचारण्याऐवजी आयसीएमआरला विचारावं,’ असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!