मुंबई : राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यभरात वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसायांची अक्षरशः वाट लागली आहे. अनलॉक १ सुरु झाल्यानंतर ओला, उबेर यासारख्या वाहनांना परवानगी देत असताना रिक्षा टॅक्सी चालकांना परवानगी देत नसल्याचे चित्र आहे.
‘सरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल’ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. संजय नाईक म्हणाले की, ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत नाही, रिक्षा, टॅक्सी चालकही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे काम करतात मग त्यांना परवानगी का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नाईक म्हणाले, राज्यात रिक्षा टॅक्सी सुरु नसल्याने अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने रुग्णांना भाडे आकारण्यात येत आहे. तेच जर रिक्षा, टॅक्सी चालकांना परवानगी दिली तर सर्वसामान्य जनतेसाठी सोयीस्कर जाईल. कोविड १९ च्या नियमांनुसार आवश्यक सुरक्षा उपकरणे वापरुन रिक्षा, टॅक्सी सुरु करण्याची सरकारने परवानगी द्यावी.
झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागं करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात वाहनचालकांनी येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता एक मिनिटांचा हॉर्न वाजवून सरकारचा निषेध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात सर्व वाहनचालकांनी जे कोणत्याही पक्षाचे असो पण आपल्या कुटुंबासाठी सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन राज्य सरकारला हा आक्रोश दाखवून देऊ असं देखील ते म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

