टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. तर शेतजमीन देखील नापीक झाली आहे. तसेच शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिक वाहून गेली आहेत. त्यामुळे सरकारने 1 हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी काही पिकं घेतली आहेत, त्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस सरकारने पूरग्रस्तांसाठी घेतलेला हा मोठा निर्णय असल्याचं बोललं जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, ऊस यासाठी घेतलेल्या जास्तीत जास्त कर्जाची रक्कम माफ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण त्याने कोणतीही कर्ज घेतलेले नसेलं अशा शेतकऱ्याला देखील सरकार आर्थिक मदत करणार आहे, त्यासाठी तीनपट भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जवळजवळ बहुतांश शेतकऱ्यांना 1 हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचा फायदा देण्याचा प्रयत्न करू, पंतप्रधान आवास योजनेतून ज्या घरांचं नुकसान झालं आहे. ती घरं बांधून देणार आहोत. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारे दोन लाख आणि त्याच्यावर 1 लाख रुपये अतिरिक्त राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहेत, अशी ही माहिती फडणवीस यांनी दिली.
- आरक्षणाच्या मुद्यावरून मोहन भागवत पुन्हा वादाच्या भोवऱ्यातंं
- ‘ईडी’ने पाठवलेल्या प्रेमपत्राला आम्ही भिक घालत नाही : शर्मिला ठाकरे
- ‘आम्ही ईडीच्या चौकशीचा धडाका लावला असता तर भाजपचा ‘भा’ पण शिल्लक राहिला नसता’
- नरेंद्र मोदी नव्या भारताचे हिटलर, पंतप्रधानांवर मनसेची कडाडून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

