Share

नरेंद्र मोदी नव्या भारताचे हिटलर, पंतप्रधानांवर मनसेची कडाडून टीका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईतील कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी राज यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस धाडल्याने मनसे आक्रमक झाली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर असल्याची टीका केली आहे, सत्ताधारी भाजप सूडबुद्धीने वागत आहे, जो तुमची प्रकरणे बाहेर काढेल, जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.

मंत्र्यांवर आरोप झाले तरी भाजप सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही, राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं करत आहेत. त्यामुळे भाजप घाबरत आहे. आज सीबीआय ईडी भाजपचे कार्यकर्ते बनले असून त्यांच्याशी कसं डील करायचं, हे मनसेला माहित असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!